आज भाजपा मुंबई कार्यालय ‘वसंत स्मृती’ (दादर पूर्व) येथे आयोजित मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिलो. आगामी संघटनात्मक कार्य, जनसंपर्क अभियान आणि पक्षविस्ताराच्या अनुषंगाने या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. तसेच, महिला मोर्चाच्या कामाचा १०० दिवसांचा अहवाल देखील प्रकाशित करण्यात आला.
यावेळी माझ्यासह महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, महामंत्री श्रीमती श्वेता परूळकर जी, पक्षाचे मुंबई पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्रवक्ते, सर्व मोर्चा/आघाडी/सेलचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि महिला मोर्चाच्या सर्व भगिनी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment