आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपा– शिवसेना– आर.पी.आय. महायुतीच्या उमेदवार सौ. निशा परुळेकर– बंगेरा यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहिलो. या सभेदरम्यान स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा तसेच येणाऱ्या काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत उपस्थित जनतेला संबोधित केले.
तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई साकारण्यासाठी, प्रभाग क्रमांक २५ मधील महायुतीच्या उमेदवार सौ. निशा परुळेकर– बंगेरा यांना कमळाच्या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले.
सदर प्रसंगी मंचावर माझ्यासह माझे ज्येष्ठ सहकारी कॅबिनेट मंत्री, आ. श्री. प्रवीण दरेकर जी, आ. श्री. प्रकाश सुर्वे जी तसेच भाजपा– शिवसेना– आर.पी.आय. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्रमांक २५ चा शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेकेंद्रित कामकाज निश्चितपणे साध्य होण्यासाठी जनतेने भाजपा–शिवसेना–आर. पी. आय. महायुतीला निवडून देण्याचा एकमताने निर्धार व्यक्त केला.














Leave a Comment