रक्तदान हेच श्रेष्ठदान!
महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे नेते, लाडके मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कूपर रुग्णालय, विलेपार्ले येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि देवतुल्य जनतेची सेवा घडावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक अनिष मकवानी जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी तसेच कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे जी यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
जनसेवेचा हा संकल्प यशस्वी करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, डॉक्टरांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व लाडक्या देवेंद्रजींना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!














Leave a Comment