मुंबई
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या परिवर्तनकारी राष्ट्रसेवेला एक तप म्हणजेच १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने, आज मुंबई भाजपच्या वतीने एक महत्त्वाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पक्षीय उपक्रम, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाचे विचार घराघरांत पोहोचवण्याच्या धोरणात्मक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माझ्यासह भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबई महामंत्री श्रीमती श्वेता परुळकर जी, इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदीजींच्या १२ वर्षांतील ऐतिहासिक कामगिरीची माहिती मुंबईतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आणि देवतुल्य कार्यकर्ते सज्ज आहेत. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढवून नवभारताचा हा संकल्प पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! ![]()












Leave a Comment