बृहन्मुंबईतील महत्त्वाच्या पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी मंगळवार, दि. १९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्रा’ला विशेष भेट देऊन तेथील सद्यस्थिती व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सदर पाहणीदरम्यान कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, माननीय महापौर श्रीमती रितू तावडे जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, मुंबई महानगपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. गणेश खणकर जी, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले जी, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवडकर जी, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी, जिल्हाध्यक्षा शलाकाताई साळवी, भाजप मुंबई उपाध्यक्ष श्री. किरण शेलार जी, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोषी जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती संगीता शर्मा जी, स्थापत्य समिती अध्यक्षा (शहर) श्रीमती यामिनी जाधव जी, बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वसराव, नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे जी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर आदी मान्यवर व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने व गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आमचे लोकप्रतिनिधी सदैव तत्पर आहेत.
















Leave a Comment