आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक ६७ मध्ये सिटीझन मीटचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, सूचना तसेच अपेक्षा मोकळ्या मनाने मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक व सखोल संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी श्री. सतीश मोढ तसेच प्रभाग क्रमांक ६७ चे महायुतीचे उमेदवार श्री. दीपक कोतेकर हे उपस्थित होते. त्यांनी नागरिकांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून त्यावर मार्गदर्शन केले आणि विकासकामांना गती देण्याचा तसेच सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
जनतेच्या सक्रिय सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाम पावले उचलणे आणि विश्वासावर आधारित प्रशासन देणे, या संकल्पनेने आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.











Leave a Comment