माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर, शिवाजीनगर आणि नेहरूनगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये पूर्ण झालेल्या बायोमेट्रिक सर्व्हेनुसार परिशिष्ट-२ तयार करणे, न्यू बसेरा SRA स्कीम व SRA Co-operative Society योजनांची कार्यान्वित करणे, तसेच धाकूशेठ पाडा, श्री गणेशवाडी SRA सोसायटी (म्हातारपाडा) हे कार्यान्वित करणे तसेच, लोकनायक नगर आणि कपासवाडी येथील SRA योजनांमध्ये उद्भवलेल्या विविध अडचणी दूर करण्यासाठी विविध मतदारसंघातील SRA च्या प्रकल्पांच्या समस्या दूर करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सक्षम प्राधिकारी श्रीमती गीतांजली शिर्के, सचिव श्री. दत्तात्रेय नवले, सक्षम प्राधिकारी श्री. मोहन नळदकर, कार्यकारी अभियंता श्री. राजाराम पाटील, सहाय्यक अभियंता श्री. विनोद तिर्हेकर आणि उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष) श्री. लंबाते, सह निबंधक संध्या बावनकुळे, सक्षम प्राधिकारी म्हाडा रेडेकर, यांच्या उपस्थितीत हा सविस्तर आढावा घेण्यात आला.















Leave a Comment