आगामी जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच मोदी सरकारची १२ वर्षे याच्या औचित्याने मुंबईत भव्य उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आज दादर येथील मुख्य कार्यालयात एक विशेष बैठक यशस्वीरित्या पार पडली.
या बैठकीला कार्यक्रमाचे सर्व आदरणीय संयोजक सह-संयोजक आणि मुंबई भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन्ही महत्त्वाच्या जागतिक दिवसांचे महत्त्व जनमानसांत पोहोचवण्यासाठी आणि विविध वॉर्डांमध्ये राबवायच्या कार्यक्रमांच्या रुपरेषेबाबत सविस्तर चर्चा करून अंतिम नियोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देणारे हे आगामी उपक्रम मुंबईत नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे होतील, असा मला ठाम विश्वास आहे.















Leave a Comment