पं. दीनदयाल उपाध्याय विशेष प्रशिक्षण वर्गाचा यशस्वी समारोप
भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो सशक्त विचारधारेवर उभा असलेला एक कार्यकर्त्यांची संघटना आहे. या विचारांना बळकटी देण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभा
क्षेत्रातील तिन्ही मंडळांच्या वतीने ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज समारोप पार पडला. या उपक्रमातून कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठानासोबतच संघटन कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत, समाजातील शेवटच्या घटकाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना देण्यात आली. या महाभियानाद्वारे बदलत्या सामाजिक आणि राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे कार्यकर्त्यांची कार्यक्षमता आणि समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ झाली.
आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘विकसित भारत’आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे ‘समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा एक महत्त्वाचा दुवा आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, तसेच अंधेरी पश्चिम विधानसभेचे नगरसेवक आणि नगरसेविका, पदाधिकारी, जिल्हा आणि मंडळ अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.












Leave a Comment