विचारधारा आणि संघटनात्मक बांधणीचा संकल्प: ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ संपन्न! ![]()
भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एका महान विचारधारेवर आधारित कार्यकर्त्यांची संघटना आहे. आपल्या कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी बोरिवली विधानसभा क्षेत्रातील तिन्ही मंडळाच्या ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत विशेष प्रशिक्षण वर्गाचा एकत्रित समारोप पार पडला.
“समाजातील शेवटच्या माणसाच्या प्रगतीचा दृष्टिकोन आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य हाच आमचा मार्गदर्शक आहे,” हा पंडितजींचा अंत्योदयाचा विचार घेऊन आमचे कार्यकर्ते जनसेवेसाठी सदैव तत्पर आहेत. या महाभियानाच्या माध्यमातून संघटन कौशल्यासोबतच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचे ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे ‘समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता एक सक्षम दुवा म्हणून काम करत आहे. ‘संघटनेची विस्तार यात्रा’ अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
याप्रसंगी आमदार श्री. संजय उपाध्याय जी, वॉर्ड अध्यक्ष श्री. सतीश पारकर जी तसेच मुंबई भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, जिल्हा आणि मंडळ अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.















Leave a Comment