आज प्रभाग ४७ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीचे उमेदवार व मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. तजिंदर सिंह तिवाना यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला व यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागाच्या सर्वांग सुंदर विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी महायुतीला पाठिंबा देऊन वॉर्ड क्रमांक ४७ मधून महायुतीचे उमेदवार श्री. तजिंदर सिंह तिवाना यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री मा. श्री भाई गिरकर जी , माजी नगरसेविका सौ. जया तिवाना जी,युनूस खान तसेच भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Leave a Comment