मुंबईकरांच्या नावे आणखी एक ऐतिहासिक विक्रम!
आधी बृहन्मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा विक्रम करत होती आता बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची सेवा करण्याचा विक्रम करीत आहे.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात एकाच दिवशी २९८ ठिकाणी २७,८६६ +++ महिलांनी तपासणी करून घेत नवा इतिहास रचला आहे. या मोहिमेची “Asia Book of Records” आणि “India Book of Records” मध्ये नोंद झाल्याबद्दल महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष सोहळ्यात महापौर श्रीमती रितू तावडे जी आणि उपमहापौर श्री. संजय घाडी जी यांच्यासोबत उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सभागृह नेते श्री. गणेश खणकर, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा श्रीमती हेतल गाला, नगरसेवक श्री. तेजिंदर तिवाना, नगरसेवक श्री. भास्कर शेट्टी, पालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे व उपायुक्त श्री. शरद उघडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.












Leave a Comment