गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या गरजू बंधू-भगिनींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि या प्रक्रियेत पारदर्शकता व गती राखणे, या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सहायता कक्षा’च्या आधारावर पालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ सेवेत रुजू करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे लाडके नेते, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कक्षाचे माझ्या शुभहस्ते आणि मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. गरजू रुग्णांना त्वरित अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम असून, याप्रसंगी माझ्या हस्ते कक्षाला २५ हजार रुपयांचा धनादेश (चेक) सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माझ्यासह महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी, भाजप गटनेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिरगे, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, मुख्यमंत्री सहायता निधीचे श्री. रामेश्वर नाईक व श्री. मंगेश चिवटे, नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना जी, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे यांच्यासह विविध समित्यांचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू रुग्णांना वेळेवर आर्थिक व वैद्यकीय पाठबळ पुरवून त्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा कक्ष अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

















Leave a Comment