भाजपा आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२८ वा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रमात आज सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला. शालांत वर्ष २०२६ मधील १० वी व १२ वीच्या परीक्षेत ९०% व त्याहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे हा अत्यंत आनंददायी अनुभव होता.
याप्रसंगी माझे सहकारी आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, निमंत्रक व नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे जी, नगरसेविका दीपिका घाग जी, नगरसेविका हेतल गाला – मोरवेकर जी, माजी नगरसेविका सारिका पवार जी आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या कठोर परिश्रमाने यश खेचून आणणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पालकांचे मनापासून अभिनंदन!

















Leave a Comment