जय जगन्नाथ!
लोखंडवाला, अंधेरी येथील भक्तीवेदांत स्वामी मिशन स्कूलमध्ये आयोजित ‘श्री जगन्नाथ रथयात्रा’ सोहळ्याच्या भव्य उद्घाटन सत्रात सहभागी होण्याचा आणि उपस्थितांना संबोधित करण्याचा योग आला. शांती आणि सलोख्याचे प्रतीक असलेला हा मंगलमयी उत्सव मनाला असीम ऊर्जा देणारा आहे.
या पावन प्रसंगी माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा जी, मंत्री मा. श्री. नितेश राणे जी, खासदार श्रीमती हेमा मालिनी जी, हिंदूजा ग्रुपचे चेअरमन श्री. प्रकाश हिंदूजा जी, इसकॉन जुहूचे मंदिर अध्यक्ष श्री. ब्रजहरी प्रभू जी, झोनल सेक्रेटरी श्री. देवकीनंदन प्रभू जी, रथयात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. सुरादास प्रभू जी आणि श्री. महेश शर्मा जी यांच्यासह अनेक मान्यवर व श्रद्धाळू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाप्रभू जगन्नाथांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता लाभो, हीच चरणी प्रार्थना!













Leave a Comment