घाटकोपर, प्रभाग क्र. १२६ च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती श्री. संजय भालेराव, जे २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उबाठा गटाचे उमेदवार होते, या दोघांनी आज माझ्या तसेच माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
भाजपा मुंबईचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे भारतीय जनता पार्टीत मनःपूर्वक स्वागत केले. आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत झालेल्या मुंबईच्या सर्वांगीण विकासकार्याने प्रभावित होऊन भालेराव दाम्पत्याने आज भाजपात प्रवेश केला.
यावेळी मंचावर आ. श्री. राम कदम, सरचिटणीस आचार्य श्री पवन त्रिपाठी, सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर, सरचिटणीस श्रीमती श्वेता परूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.










Leave a Comment