मार्कंडराय प्रीमियर लीग (MPL) या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला नगरसेवक दीपक कोतेकर जी यांचयसह उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. क्रिकेट हा आपल्यासाठी केवळ एक खेळ नसून, तो मुंबईचा ‘श्वास’ आहे!
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत आणि आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, आम्ही मुंबईतील क्रीडा संस्कृतीला अधिक गती देण्यासाठी कटिबद्ध आहोत. युवकांच्या सर्वांगीण विकासाला आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.
‘MPL’ सारख्या स्पर्धा स्थानिक टॅलेंटला मोठे व्यासपीठ मिळवून देतात. मोदीजींनी दिलेल्या ‘फिट इंडिया’च्या मंत्रानुसार, मैदानातील ही जिद्द आणि सांघिक भावनाच उद्याचे सक्षम नागरिक घडवण्यास मदत करते.
विजेत्या संघाचे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच, या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे विशेष कौतुक.













Leave a Comment