मुंबईच्या स्वच्छतेचा नवा अध्याय! ![]()
‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या आपल्या अभियानाला मोठे यश मिळाले असून, बीएमसीकडून ‘मुंबई क्लीन लीग’ या शहरव्यापी स्वच्छता स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, ‘मुंबई क्लीन लीग’ ही कल्पना आपल्या अभियानातूनच समोर आली. या उपक्रमादरम्यान मला अक्षय कुमार यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांनी परिसरनिहाय स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आणि ‘मुंबई क्लीन लीग’ हे नावही त्यांनीच सुचवले.
‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या अभियानातून मुंबईभरातून तब्बल २.६५ लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या. हमाल, डबेवाले, रिक्षाचालक, युवक, व्यावसायिक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती अशा विविध घटकांशी थेट संवाद साधत आपण हा लोकसहभागाचा उपक्रम उभारला.
या ‘मुंबई क्लीन लीग’मुळे शहरातील प्रत्येक भागात आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होईल, नागरिकांमध्ये नागरी जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होईल आणि स्वच्छ भारत मिशनमध्ये मुंबईचा क्रमांक उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असा मला विश्वास आहे.
या स्पर्धेत सर्वात स्वच्छ प्रभाग, निवासी संकुले, झोपडपट्ट्या, व्यावसायिक आस्थापने तसेच रुग्णालये, शाळा, शौचालये, रस्ते, बागा आणि बाजारपेठा अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. पारितोषिकांची रक्कम ₹१.५ लाख ते ₹२५ लाखांपर्यंत असून, सर्वात स्वच्छ प्रभागासाठी ₹२५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या अभियानातून मिळालेल्या सूचनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
मुंबई स्वच्छ, सुंदर आणि जागतिक दर्जाची बनवण्यासाठी प्रत्येक मुंबईकराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्व मिळून ‘मुंबई क्लीन लीग’ला यशस्वी करूया!











Leave a Comment