आज ‘साई दातार सामाजिक विकास सेवा संस्था (न्यास)’ तर्फे आयोजित श्री रामनवमी उत्सव आणि श्री साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात सहभागी झालो. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा भक्तीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री साई भजन संध्येचा आनंद घेता आला. साईंच्या दरबारात नतमस्तक होऊन एक वेगळीच आत्मिक शांती अनुभवली.
या सोहळ्याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंधेरी जी, स्नेहंकित श्री. बजरंग दांडेकर जी, संयोजक श्री. मल्लेश खटकर जी आणि अनेक स्थानिक साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment