दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे मुंबई भाजपा लीगल सेल वतीने आयोजित ‘ॲडव्होकेट्स गेट-टुगेदर’ व मार्गदर्शन बैठकीत सहभागी झालो.
विधी क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्यायव्यवस्थेत लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विधी क्षेत्रात संघटन अधिक बळकट करून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
याप्रसंगी भाजपा मुंबई सरचिटणीस श्री राजेश शिरवडकर, नगरसेवक ॲड. गौरांग झवेरी, नगरसेवक ॲड. कमलाकर दळवी, लीगल सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. उदय डबलेजी, वरिष्ठ वकील ॲड. पारिजात पांडेजी, ॲड. अनिकेत निकम, ॲड. क्षितिजा वानखेडे, सह संयोजक ॲड. मदन गुप्ता आणि मुंबई लीगल सेलचे मुख्य संयोजक ॲड. अमित मेहता यांच्यासह अनेक मान्यवर वकील बांधव उपस्थित होते.
उत्कृष्ट नियोजनाबद्दल ॲड. अमित मेहता, ॲड. शहाजीराव शिंदे आणि ॲड. मदन गुप्ता यांचे मनःपूर्वक अभिनंदन!












Leave a Comment