गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने नेहरू नगर येथे आयोजित कार्यक्रम तसेच भव्य पालखी सोहळ्यास उपस्थित राहिलो. मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा साज जपणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मन आनंदित झाले.
ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या पालखी सोहळ्याने परिसरात उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा उपक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत असून, समाजात एकात्मता आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत होते.
या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, मंडळ अध्यक्ष श्री. विश्वजीत चंद, वॉर्ड अध्यक्ष दिनेश जिवेंद्र, महिला वॉर्ड अध्यक्षा कल्पना सावंत तसेच अनेक स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ![]()
![]()
















Leave a Comment