आज दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी माझ्यासोबत कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा जी, जिल्हाध्यक्ष सौ. शलाका ताई साळवी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून, मुंबई शहर पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि सुंदर, स्वच्छ, सुरक्षित मुंबईच्या निर्मितीसाठी तमाम नागरिकांचे आशीर्वाद घेतले.















Leave a Comment