आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे मुंबईतील १०० महाविद्यालयांच्या बाहेर तरुणाईकडून मुंबईच्या विकासासाठीच्या सूचना नोंदविण्याची मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचा एक भाग म्हणून आज अंधेरी येथील भवन्स कॉलेजच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे उभारलेल्या स्टॉलला भेट देऊन उपस्थित तरुणांशी संवाद साधला आणि त्यांच्या सूचनांची नोंद केली.
या प्रसंगी माझ्यासोबत श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष तसेच भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना, जिल्हा महामंत्री दीपक कोतेकर, भाजयुमो जिलाध्यक्ष डॉ. केयूर प्रमाणिक तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












Leave a Comment