भायखळा विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक २०७ मधील भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. शलाका साळवी तसेच श्री. नितीन बनकर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटित ताकद, स्पष्ट नियोजन आणि विकासाभिमुख विचारांच्या बळावर प्रभाग २०७ मध्ये महायुतीचा विजय निश्चित करण्याचा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी एकमताने व्यक्त केला.











Leave a Comment