मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, एस. एन. डी. टी वुमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी माझ्यासोबत मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, नगरसेविका श्रीमती हेतल गाला, श्री. अविनाश ढाकणे जी (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.













Leave a Comment