ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर.
आज भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले.
बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाली. देशाच्या प्रगतीसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी असे प्रशिक्षण वर्ग अत्यंत मार्गदर्शक ठरतात.
यावेळी माझ्यासह भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, भाजपा मुंबई महामंत्री श्रीमती श्वेता परुळकर जी, मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी देखील उपस्थित होते.
या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आणि उपस्थित सर्व उत्साही कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!













Leave a Comment