







क्रांतिसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा…
भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुद्ध नगर, जुहू डायमंड व इर्ला ब्रिज या ठिकाणी ध्वजरोहन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली. तसेच, जमलेल्या सर्व बंधू- भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, आणि बंधुता यासाठी दिलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत.
सदर कार्यक्रमात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत, त्यांच्या विचारांना आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे.
Leave a Comment