मुंबईतील रस्ते विकासाला वेग… खड्डेमुक्त मुंबईकडे भक्कम पाऊल! ![]()
![]()
![]()
आज महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सी.सी. रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मुंबईतील एकूण रस्ते जाळे सुमारे २,०५० कि.मी. इतके असून, त्यापैकी २०२२ पूर्वी सुमारे १,२०० कि. मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले होते. २०२२ नंतर अतिरिक्त ६७७ कि.मी. रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ७१% म्हणजेच ४८१ कि. मी. काम पूर्ण झाले आहे.
हे काम दोन टप्प्यांत सुरू असून, टप्पा १ (३०७ कि.मी.) ऑक्टोबर २०२३ पासून, तर टप्पा २ (३७० कि.मी.) ऑक्टोबर २०२४ पासून सुरू आहे. उर्वरित कामापैकी १०-१५% काम मे २०२६ पर्यंत, तर आणखी १०% काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होणार असून, तेव्हा मुंबईतील सुमारे १,९०० कि.मी. रस्ते काँक्रीटचे असतील.
कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी Indian Institutes of Technology यांची तृतीय-पक्ष (थर्ड पार्टी) ऑडिटसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या टप्पा २ चे ऑडिट सुरू असून, टप्पा १ चेही ऑडिट IIT मार्फत करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात लक्षणीय घट झाली आहे. २०२३-२४ मध्ये ₹२०२ कोटी असलेला खर्च २०२४-२५ मध्ये ₹१५६ कोटींवर आला (२३% घट), तर २०२५-२६ मध्ये ₹८९ कोटी (४३% घट) इतका झाला आहे. यंदाच्या वर्षी हा खर्च सुमारे ₹४४ कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता असून, ही आणखी ५०% घट दर्शवते.
खड्डेमुक्त, टिकाऊ आणि आधुनिक रस्ते, हीच आमची मुंबईकरांप्रती बांधिलकी…!














Leave a Comment