मुंबईकरांसाठी अधिक पारदर्शक आणि सुलभ आरोग्यसेवेकडे मोठं पाऊल! ![]()
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन शर्मा जी यांच्या उपस्थितीत बीएमसीसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही निर्णायक निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेकडील सर्व आरोग्यविषयक खरेदी आता Government e-Marketplace (GeM) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि दर्जेदार औषधे व उपकरणे योग्य दरात उपलब्ध होतील.
तसेच, बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड एक महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना खाटांची उपलब्धता घरबसल्या कळणार असून, अनावश्यक धावपळ टळणार आहे.
पुढील काही वर्षांत बीएमसी रुग्णालयांमध्ये सुमारे २,००० नवीन खाटांची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. या खाटांचा पूर्ण क्षमतेने उपयोग होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेही अत्यावश्यक आहे.
मुंबईकरांना दर्जेदार, सुलभ आणि पारदर्शक आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील.












Leave a Comment