रुग्ण आजारपणाशी लढत असताना त्याच्या नातेवाईकांना निवासासाठी वणवण करावी लागू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याच भावनेतून आज ‘निरामय फाउंडेशन’च्या माध्यमातून वॉर्ड ७० मध्ये मोफत हॉस्टेल आणि भोजन सुविधेचा शुभारंभ केला.
या केंद्रात एकावेळी १५० हून अधिक व्यक्तींना राहण्याची सोय उपलब्ध असून, उपचाराच्या काळात त्यांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात राहता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा प्रकारच्या सुविधेमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
यावेळी माझ्यासह अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय प्रमुख शरदराव ढोले जी, रामेश्वर नाईक जी, योगेश्वर गडदे जी, विलास भागवत जी, स्थानिक नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, स्थानिक नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, स्थानीय नागरिक उपस्थित होते. या उपक्रमासाठी निरामय फाउंडेशनचे अभिनंदन.
समाजहितासाठी कटिबद्ध अशा उपक्रमांना सदैव पाठिंबा देत, मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत राहणे हेच आमचे ध्येय! ![]()














Leave a Comment