आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे.
याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीणभाऊ दरेकर जी, भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आ. श्रीमती चित्राताई वाघ, आ. श्री. अतुल भातखळकर जी, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन जी, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. श्रीमती मनीषाताई चौधरी, आ. श्रीमती विद्या ठाकूर जी, आ. श्री. पराग शाह जी, आ. श्री. संजय उपाध्याय जी, आ. श्री. मिहीर कोटेचा जी तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे जी, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी उपस्थित होते.









Leave a Comment