परम पूज्य आचार्य नय पद्मसागर जी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित ‘श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २०२६’ या भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांच्यासह सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला. ![]()
भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या शिकवणी आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा केवळ जैन समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरतो.
या कार्यक्रमादरम्यान संतवाणी, आध्यात्मिक वातावरण आणि समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळाली. अशा उपक्रमांमुळे समाजात सद्भावना, एकात्मता आणि नैतिक मूल्यांची जपणूक अधिक बळकट होते.
या पवित्र सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या भारत जैन महामंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

















Leave a Comment