महाराष्ट्राचे आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेतील एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे ३० वर्षांवरील महिला भगिनींसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्ला देण्यात आला. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक अनिष मकवानी जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे जी उपस्थित होते.
जनसेवेचा हा महायज्ञ यशस्वी करणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्यसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!













Leave a Comment