भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मुंबई द्वारे आयोजित ‘भव्य समाज मेळावा’ प्रसंगी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भाजप हा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणारा पक्ष असून, संघटन अधिक मजबूत करणे आणि ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी पक्षाची धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या प्रसंगी भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी व ओबीसी मोर्चा मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्री. शरद चिंतनकर जी, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष समीर पवार जी, ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष मुकुंद काकड जी आणि उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र झोरे जी तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील सर्व सहकाऱ्यांना आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन पक्षकार्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

















Leave a Comment