लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा!
आज मी स्वतः भारत निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत सहभागी होत ‘SIR Enumeration Form’ भरला आणि माझे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
या निमित्ताने माझे सर्व जागरूक नागरिकांना आणि मतदारांना नम्र आवाहन आहे:
“आपल्या मतदानाचा पवित्र हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या SIR प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. हा फॉर्म भरणे ही केवळ एक औपचारिकता नसून, आपल्या लोकशाहीला अधिक सक्षम आणि मजबूत बनवण्याची आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
चला, आपण सर्वांनी मिळून या ‘SIR’ प्रक्रियेत सहभागी होऊया! आजच स्वतःचा फॉर्म भरा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रपरिवारालाही हा फॉर्म भरण्यासाठी प्रोत्साहित करा!








Leave a Comment