मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य व्हावा आणि शहरात कुठेही पाणी साचू नये, या उद्देशाने आज मुंबई भाजप अध्यक्ष या नात्याने पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
सकाळपासून आयोजित केलेल्या या विशेष पाहणी दौऱ्यात मुलुंड येथील बाऊंड्री नाल्यावर जाऊन गाळ उपसण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासली. या कामात पारदर्शकता असावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्ण क्षमतेने स्वच्छ व्हावेत, यादृष्टीने प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत.
यावेळी माझ्यासोबत आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती साक्षी दीपक दळवी जी, महिला मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री. योजना ठोकळे जी, तसेच डॉ. विपीन शर्मा (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.











Leave a Comment