जय भीम! जय महाराष्ट्र! 💙🙏
मुंबईच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त छत्रपती
शिवाजी महाराज मैदानावर तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.
२००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारलेली बाबासाहेबांची जीवनगाथा पाहून ऊर अभिमानाने भरून आला. मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून मला आनंद आहे की, आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाबासाहेबांचे समतावादी विचार जनमानसात पोहोचवत आहोत.
गायिका वैशाली माडे जी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भीमस्वरांनी या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.
या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय श्री. रामदास आठवले जी, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री. संजय शिरसाट जी, सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, श्री. सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष माननीय श्री. सदा सरवणकर जी, आमदार माननीय श्री. प्रसाद लाड जी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे जी आणि अनेक मान्यवरांसोबत उपस्थित राहून या क्षणांचा साक्षीदार होता आले.
बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा प्रगत भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया, हाच आजच्या या भव्य सोहळ्याचा खरा उद्देश आहे.












Leave a Comment