आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या गतिमान विकासकामांवर विश्वास ठेवून आज विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये मनसेचे माजी पदाधिकारी आणि वॉर्ड क्र. २०२ मधील प्रभावी अपक्ष उमेदवार अजित मुणगेकर जी, साफल्य गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी निर्भय तळेकर जी, अभ्युदय नगर काळाचौकी येथील डॉल्फिन को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा मिश्रा जी व खजिनदार शांग्रीला दोषी जी, प्रतिष्ठित सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अमित मिश्रा जी व सुमित मिश्रा जी, वॉर्ड क्र. २०५ चे राहुल कदम आणि त्यांचे सहकारी, तसेच के.ई.एम. व नायर हॉस्पिटलमधील कामगार आकाश सोळंकी व सागर सोळंकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाका साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंह, श्री. सतीश तिवारी, मंडळ अध्यक्ष श्री. पार्थ बावकर आणि मंडळ अध्यक्ष श्री. सचिन शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि जनहितकारी धोरणांमुळे प्रभावित होऊन या सर्व मान्यवरांनी भाजपचा झेंडा हाती धरला आहे. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे अभ्युदय नगर आणि काळाचौकी परिसरात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात जनसेवेचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.
मी या सर्व नवनियुक्त सहकाऱ्यांचे भाजप परिवारामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो! ![]()
![]()













Leave a Comment