मुंबईच्या प्रगतीला आधुनिकतेची जोड देत आज अंधेरी पश्चिम मतदारसंघातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले.
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्यजी शिंदे यांच्या शुभहस्ते ‘जन सेवा कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत ‘नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालयाचे’ भव्य उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे कार्यालय आता केवळ टपाल सेवांचे केंद्र न राहता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधांनी सज्ज झाले आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर आम्ही सर्वांनी या इमारतीची आणि तेथील नागरिकाभिमुख सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.
भाजपा मुंबई अध्यक्ष आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, अंधेरीकरांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे आता ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना टपाल विभागाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळतील. विकासाचा हा झंझावात असाच सुरू राहील आणि आम्ही ‘भविष्यसज्ज मुंबई’ घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.













Leave a Comment