महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आदरणीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी आज उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्यात संघटनात्मक बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या सूचनेनुसार, मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमासाठी जात आहेत, तिथे त्यांनी संघटनात्मक बैठक घेणे अपेक्षित आहे.
याच सूचनेचे पालन करत, गोरेगाव (पूर्व) येथे शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजाताईंनी उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या संघटनेची बैठक घेतली.
यावेळी माझ्यासह आ. श्रीमती विद्याताई ठाकूर, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. जयप्रकाश ठाकूर जी, भाजप अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रभारी श्री रघुनाथ कुलकर्णी जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पावन त्रिपाठी जी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी देखील उपस्थित होते.











Leave a Comment