भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई
‘महिला संवाद’ – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२०२७
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई तर्फे आयोजित ‘महिला संवाद’ कार्यक्रमात आज प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहिलो व माता-भगिनींशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेट २०२६-२७ मधील महिलाभिमुख तरतुदी, जसे की ‘शी-मार्ट’ (SHE-Marts), ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृहांची निर्मिती, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ. श्रीमती चित्राताई वाघ,आ.श्रीमती उमाताई खापरे, आ. श्रीमती मनिषाताई चौधरी, माजी आ. श्रीमती कांताताई नलावडे, मुंबई महिला मोर्चा संयोजिका श्रीमती रितू तावडे जी, भाजपा महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मुंबईतील महिला बचत गटाच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विकसित भारताच्या उभारणीत ‘नारी शक्ती’चा सहभाग अधिक सक्षम करणारा हा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल हा विश्वास यावेळी मी व्यक्त केला.
















Leave a Comment