आज ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागांतर्गत ‘सरदार वल्लभभाई पटेल उद्यान’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला.
या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता जी, के/पश्चिम वॉर्डचे उद्यान विभाग अधिकारी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंधेरी पश्चिम परिसरातील आपली ही उद्याने अधिक सुंदर, हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. भावी पिढीला स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्याचा आमचा हा निर्धार असाच पुढे सुरू राहील! ![]()
![]()











Leave a Comment