नमो बुद्धाय! सप्रेम जय भीम! ![]()
आज चेंबूर, मुंबई येथील ‘ग्रँड नालंदा बँकवेट हॉल’ मध्ये ‘ऑल इंडिया भिक्खू संघ’ तर्फे आयोजित ‘ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले.
हा केवळ एक कार्यक्रम नसून, तथागत भगवान बुद्धांच्या ‘शांती, करुणा आणि प्रज्ञा’ या विचारांचा पुनरुच्चार करणारा एक मंगलमय सोहळा होता. वंदनीय भदंत भिक्खू संघ, श्रामणेर आणि देशभरातून आलेल्या धम्मप्रेमी उपासक-उपासिकांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते.
भगवान बुद्धांच्या शांती आणि मानवतेचा विचार जनमानसापर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे मनापासून समाधान आहे.










Leave a Comment