आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई, चारकोप विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री योगेश सागर जी, माजी मंत्री श्री भाई गिरकर जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री गणेश खणकर जी , उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री दीपक तावडे जी, माजी नगरसेविका श्रीमती प्रतिभाताई गिरकर, माजी नगरसेविका श्रीमती लीना देहरेकर यांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.














Leave a Comment