महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ अंतर्गत अंधेरी (पश्चिम) येथील जानकीबाई हॉल येथे आयोजित विशेष शिबिरात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वारस प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, Property Card, नवीन/सुधारित Ration Card, संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्रक तसेच BMC अंतर्गत उन्नती महिला बचत गट, जिजाऊ व इफराह नोंदणी प्रमाणपत्रांचा समावेश आहे. सर्वसामान्यांचे प्रशासकीय प्रश्न तातडीने सुटावेत आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी आमचे सरकार सदैव कटिबद्ध आहे!
या प्रसंगी नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, तहसीलदार स्नेहलता स्वामी, विलेपार्ले सीटीएसओ दत्तात्रय सातपुते, अंधेरीचे एनए तहसीलदार सिद्धार्थ धनासकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























Leave a Comment