महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्ला देण्यात आला. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी माझ्यासह नगरसेवक विठ्ठल बंदेरी जी, तहसीलदार हेमलता स्वामी जी, विलेपार्ले CTSO दत्तात्रय सातपुते जी आणि अंधेरी एन.ए. तहसीलदार सिद्धार्थ धनस्कर जी प्रमुख उपस्थित होते.
जनसेवेचा हा महायज्ञ यशस्वी करणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्यसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!








Leave a Comment