देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या गौरवशाली कार्यकाळाची १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक प्रित्यर्थ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष ग्रंथ जनतेला समर्पित करण्यात आला.
यावेळी माझ्यासह मंत्री माननीय श्री. मंगल प्रभात लोढा जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. योगेश सागर जी, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस श्री. सुनील राणे जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे जी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार श्री. निरंजन डावखरे जी. आमदार डॉ. संजय कुटे जी, मीडिया विश्वातील प्रतिष्ठित मान्यवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोदीजींच्या नेतृत्वाखालील ‘एक भारत अखंड भारत’ ते ‘परिपूर्ण भारत’ या १२ वर्षांच्या देदीप्यमान कालखंडातील राष्ट्रविकासाची तथ्ये, आकडेवारी आणि नवभारताचे स्थित्यंतर या अंकात सचित्र मांडण्यात आले आहे. या अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सोहळ्यात भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. मोदीजींचे हे कर्तृत्व आम्हा सर्व कार्यकर्त्यांना निरंतर देशसेवेची ऊर्जा देत राहील! ![]()














Leave a Comment