मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनतेसाठी उत्तरदायी प्रशासन देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.
दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गात राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार भारतीय जनता पक्षाच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हा आमचा संकल्प आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. योगेश सागर जी, मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सौ. रितूताई तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका भाजपाचे गटनेते श्री. गणेश खणकर, मुंबई भाजपा सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस सौ. श्वेता परूळकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा व नगरसेविका सौ. राजेश्री शिरवडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, भाजपा मुंबईचे चिटणीस व नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, तसेच इतर नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौर श्रीमती रितूताई तावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवडकर आणि सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी यांच्यासह मुंबई महानगरपालिकेसाठी पहिल्या १०० दिवसांच्या २० कलमी कार्यक्रमाची माहिती दिली.
मुंबईकरांसाठी दिलेला १०० दिवसांचा अजेंडा निश्चितपणे पूर्ण करू, असा मला विश्वास आहे. याच वेळी कोविड काळात सेवा बजावताना कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या मुंबई भाजपच्या ५६ कार्यकर्त्यांना समर्पित पुस्तकाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.















Leave a Comment