विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक ठोस पाऊल! ![]()
![]()
आज के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या आणि रुबल नागी आर्ट फाउंडेशन संस्थापक रुबल नागी रुबल नागी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १० संगणकांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली, ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या ज्ञानविश्वाचा विस्तार होईल.
या प्रसंगी नगरसेविका सौ. सुनीता मेहता, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, तसेच विश्वजीत चंद, अमित सिंह आणि भाजपा कार्यकर्ते व शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या साकार झाला.
बीएमसी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शाळा प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मुंबईतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे, यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया- हीच आमची भूमिका! ![]()
















Leave a Comment