आज दि. ०६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघांसाठी तळेगाव येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरादरम्यान पक्षाचा ध्वजवंदन सोहळा उत्साहात पार पडला. ![]()
राष्ट्रगीत गायनानंतर प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांचा जोश, निष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी पाहून मनापासून समाधान वाटले.
या प्रशिक्षण शिबिरात आमदार श्री. मिहिरभाई कोटेचा यांच्यासह मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. अशा उपक्रमांमधून संघटन अधिक मजबूत होत असून, जनसेवेसाठीची आपली बांधिलकी अधिक दृढ होत आहे. ![]()















Leave a Comment